esakal | संजय राऊत यांचे ट्विटव्दारे भाजपवर शरसंधान, राजकीय गोटात खळबळ?
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay-raut.jpg

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक नवीन ट्विट केले आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारे हे ट्विट आहे. त्यांनी या आपल्या ट्विटव्दारे भाजपवर व मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

संजय राऊत यांचे ट्विटव्दारे भाजपवर शरसंधान, राजकीय गोटात खळबळ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक नवीन ट्विट केले आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारे हे ट्विट आहे. त्यांनी या आपल्या ट्विटव्दारे भाजपवर व मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत .

दरम्यान, त्यांनी या ट्विटव्दारे भाजपच्या सध्याच्या एककल्ली आणि हुकूमशाही धोरणावर कडाडून टीका केली आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारने सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (सिटीझनशिप अॅमेडमेंट अॅक्ट) बदल केले आहेत. तसेच राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका (एनआरसी) कायदा केला आहे. यावरून देशभरात नागरिकांची आंदाेलने सुरु आहेत.

दरम्यान, या आंदोलनाची मोठी झळ ईशान्य़ेकडील राज्यांना पोहचत आहे. यामध्ये मोठी जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे. मोदी सरकारने केलेल्या या कायद्यांना नागरिकांचा मोठा विरोध आहे. तरी देखील सरकारने या देशातील नागरिकांना विचारात न घेता हा कायदा केला आहे. यावरून काॅंग्रेससह सर्वच पक्षांनी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील सद्यस्थितीवर भाष्य करणारे ट्विट आज केले आहे. त्यांनी आपल्या व्टिट्मध्ये म्हटले आहे की,  'तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं..' या ट्वीट त्यांनी  मोदी यांनी निशाणा केल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका; आता लक्ष्य ऍक्सिस बँक

विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीपासून ते सत्तेत येईपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे 'ट्वीटवॉर' सर्वांनीच पाहिले आहे. संजय राऊत आपल्या प्रत्येक ट्वीटमधून भाजपला सूचक इशारा करत आले आहेत. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेत आली तरी संजय राऊतांचे 'ट्वीटवॉर' सुरूच आहे. आजच्या त्यांच्या ट्वीटने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप