esakal | ...तर शिवसेना सरकार स्थापन करणार : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

...तर शिवसेना सरकार स्थापन करणार : संजय राऊत

शिवसेना सत्तेपासून एक पाऊल दूर

...तर शिवसेना सरकार स्थापन करणार : संजय राऊत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर आता भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची पहिली संधी भाजपलाच आहे. जर भाजपला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते सोबत घेतले. मात्र, तरीही त्यांचे 105 आमदार निवडून आले आहेत. पण विधिमंडळात 145 चा आकडा सिद्ध करण्यासाठी भाजपकडे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आहे. त्यामुळे आज ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत.

शिवसेना सत्तेपासून एक पाऊल दूर

शिवसेना सत्तेपासून फक्त एक पाऊल दूर आहे. आमच्याकडे शिवसेनेला पाठिंबा देणारी पत्र आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.