शिवसेना युती तोडणार? उचलले मोठे पाऊल वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

शिवसेनेतून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती आजपासून (ता. 10) मुंबईत शिवसेना भवनात होणार आहेत. या मुलाखतीला कोण कोण चेहरे असणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या मुलाखती 20 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार असे बोलले जात असले तरी, शिवसेनेची स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. शिवसेनेने आजपासून मुंबईत इच्छूक उमेदवारांच्या तोंडी मुलाखतींना सुरवात केली आहे. राज्यातील सर्व मतदारसंघातील इच्छूकांच्या मुलाखती यावेळी घेतल्या जाणार आहेत.

शिवसेनेतून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती आजपासून (ता. 10) मुंबईत शिवसेना भवनात होणार आहेत. या मुलाखतीला कोण कोण चेहरे असणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या मुलाखती 20 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या जिल्हानिहाय मुलाखती मुंबईत शिवसेना भवनात घेण्यात येणार आहेत. आज आणि उद्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पश्चिम जिल्ह्यातील पाच जिल्ह्यातील इच्छूकांच्या मुलाखती होणार आहेत. 

असा असेल मुलाखतीचा कार्यक्रम :
10 व 11 सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर
13 सप्टेंबर : अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, अकोला, वाशिम
14 सप्टेंबर : नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
15 सप्टेंबर : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड
16 सप्टेंबर : नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव
17 सप्टेंबर : नाशिक, धुळे, नंदूरबार
18 सप्टेंबर : जळगाव, नगर
19 सप्टेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
20 सप्टेंबर : ठाणे, पालघर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena may be contest separately in Assembly election