esakal | झिका नेमका कसा पसरतो? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

झिका नेमका कसा पसरतो? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार

झिका नेमका कसा पसरतो? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार

sakal_logo
By
नामदेव कुंभार

‘झिका’ विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे आढळला आहे. सध्या या रुग्णाची तब्येत स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला जाधव यांनी दिली. कोरोना महामारी, पूरानंतर राज्यावर झिकाचं संकट घोंगावत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. परिसरातील डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. झिका विषाणू आहे कसा किंवा तो पसरतो कसा? याची लक्षणे आणि उपचार कसा कराल जाणून घेऊया…

डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग होतो. डासांच्या एडीज प्रजातीद्वारे या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो. या एडीज डासांमुळे डेंग्यु आणि चिकनगुनिया आजाराचा देखील प्रसार होतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना झिका विषाणूची लागण होते. हे डास इतर व्यक्तींना चावल्यास त्यांनाही झिका विषाणूची लागण होते. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पर्यायाने डेंगी, हिवताप, चिकनगुन्या आदी आजारांची साथच तयार होते. आता झिकाचा रुग्ण सापडल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

झिकाची लक्षणे काय आहेत?-

- रुग्णाला अचानक खूप ताप आणि भरपूर थंडी वाजते

- रुग्णाचे डोके प्रचंड प्रमाणात दुखू लागते

- सांध्यामध्ये वेदना, घशात कायम दुखणे

- मानेवर, छातीवर आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात

हेही वाचा: न्यायाधिशाची हत्या की अपघात? 'तो' व्हिडिओ व्हायरल

काळजी काय घ्यावी? -

- आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी

- पाणी साठवलेल्‍या भांड्यांना योग्‍य पद्धतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे

- घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी

- घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकाऊ साहित्‍य ठेऊ नये.

- डास चावण्यापासून स्वताचा बचाव करावा. यासाठी, बग स्प्रेचा वापर करावा, मच्छरदाणीचा देखील उपयोग करावा.

- झिका विषाणूची लक्षणे दिसल्यास त्वरीत डाक्टरांशी संपर्क साधावा.

हेही वाचा: 'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

उपचार पद्धती काय?

झिका विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणताही लस किंवा औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे लक्षणे आढळ्यास डॉक्टर औषधाची शिफारस करु शकतात. परंतु रुग्णाने सतत पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेड ठेवण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा: पगार, EMI पासून ATM शुल्कापर्यंत उद्यापासून बदलणार नियम

loading image
go to top