Uddhav Thackrey: 'जेलमध्ये गेलो तर उद्धव ठाकरेंसोबतच'; ACBच्या नोटीशीनंतर राजन साळवींनी केला निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackrey: 'जेलमध्ये गेलो तर उद्धव ठाकरेंसोबतच'; ACBच्या नोटीशीनंतर राजन साळवींनी केला निर्धार

Uddhav Thackrey: 'जेलमध्ये गेलो तर उद्धव ठाकरेंसोबतच'; ACBच्या नोटीशीनंतर राजन साळवींनी केला निर्धार

राज्यात शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार, खासदार आणि मंत्री शिंदे गटात जाऊ लागले. जे काही निष्ठावंत समजले जातात त्यांना नोटिस आणि दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एन्टी करप्शन ब्युरोकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात आमदार राजन साळवी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राजन साळवी म्हणाले की, मला चौकशीची नोटीस आली आहे. मी चौकशीला सामोरं जाणार आहे. मी निर्दोष आणि स्वच्छ आहे. जनतेलाही हे सर्व माहीत आहे. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, असंही राजन साळवी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

पुढे ते म्हणाले की, हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका. माझ्यावर गुन्हा दाखल करा. मला अटक करा. मी या गोष्टींना घाबरत नाही. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोक माझ्या पाठीशी आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेना माझ्या पाठीशी आहे. जेलमध्ये जाईन, पण मी कोणाला शरण जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे. संपूर्ण देशात, महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांची बेहिशोबी मालमत्ता आहे, असे लोकं भाजपमध्ये गेल्यावर ताबडतोब स्वच्छ होतात. निर्दोष होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. आता मला नोटीस मला मिळाली आहे. माझ्या संपत्तीची, मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश हळूहळू निघताली, असंही राजन साळवी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, हो मी श्रीमंत आहे. माझी श्रीमंती ही बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर मारलेली थाप आहे. माझे शिवसैनिक ही माझी संपत्ती आणि श्रीमंती आहे. वडापाव खाऊन आम्ही जिल्ह्यातील शिवसेना वाढवली ही चूक केली का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: Prasad Lad: भाजपच्या अडचणीत वाढ? शिवरायांचा जन्म कोकणात; प्रसाद लाडांचे वादग्रस्त वक्तव्य