...तर पाय अडकून पडाल, संजय राऊतांचा कोश्यारींना इशारा

...तर पाय अडकून पडाल, संजय राऊतांचा कोश्यारींना इशारा

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्यातील वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याचं चित्र आहे. मंगळवारी नवाब मलिक यांनी उघडपणे राज्यपालांवर टीकास्र सोडलं होतं. तर आज, बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत ताशोरे ओढले आहेत. राज्यपाल सरकारच्या कामाकाज ढवळाढवळ करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल, तर पाय अडकून पडाल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला आहे.

राजभवन हे सरकारची मदत करण्यासाठी आहे, खेचण्यासाठी नाही. महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल, तर पाय अडकून पडाल, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी राज्यपालांच्या दौऱ्यावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्यपालांचे घटनाविरोधी कृत्य सुरु आहे. राज्यपालांनी त्यांचं काम करावं. भाजपशासित राज्यातील राज्यपाल दौरे का काढत नाहीत? आपलेच राज्यपाल दौऱ्यावर का जात आहेत? त्यांना कुणाची फूस मिळत आहे का? हे पाहावे लागेल.

...तर पाय अडकून पडाल, संजय राऊतांचा कोश्यारींना इशारा
पुणे : टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजय सरकारची राजकीय कारणासाठी अडवणूक आणि हस्तक्षेप करु नये, त्यांनी त्यांचं काम करावं, असेही राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com