esakal | राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर स्पष्ट करावं - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर स्पष्ट करावं - संजय राऊत

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही बैठक सकारात्मक झाली असून राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत (12 MLA appointment maharashtra) सकारात्मक आहेत. पण, त्यांनी इतके दिवस का हा प्रस्ताव का मंजूर केला नाही? त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का? हे राज्यपालांनी स्पष्ट करावं, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

ठाकरे सरकार अंसैविधानिक काम करत नाही हे राज्यपालांना देखील माहिती आहे. राज्य ज्या संकटासोबत संघर्ष करत आहे, त्यात राज्यपालांनी मार्गदर्शन करायला पाहिजे. भेटीच्या संदर्भात निर्णय काय लागेल हे राज्यपालांनी दाखवायला हवं. १२ आमदारांच्या नियुक्तीचा मंत्रिमंडळांनी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. तो राज्यपालांनी फक्त मंजूर करायचा आहे. महाराष्ट्रात कधीही राज्यपाल आणि राज्य सरकार असा संघर्ष दिसला नाही. तो आज का होतोय? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. यामध्ये उच्च न्यायालयाला मध्ये येण्याची गरज नव्हती. हा एक स्पष्ट कार्यक्रम होता. १२ जागा राज्यपाल नियुक्त केलेल्या आमदारांना मंजुरी देणे हे राज्यपालांचं कर्तव्य असतं. राज्यपालांनी ते गेल्या ८ महिन्यापासून केलेले नाही. ते आमदार अफगाणिस्तानमधून तालिबानची ट्रेनिंग घेऊन आले आहेत का? कोणी लेखक, कलाकार, तर कोणी वेगवेगळ्या समाजातून आलेले आहेत. त्यांचे अधिकार तुम्ही कसे डावलू शकता? असेही राऊत म्हणाले.

गेल्या ८ महिन्यांपासून या १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. याबाबत पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे या मुद्द्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार ही भेट ठरली होती. तसेच राज्य सरकारच्या प्रस्तावानंतरही राज्यपालांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब न केल्याने महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती.

loading image
go to top