Rahul Gandhi : सर्व काही अलबेल, चिंता नसावी - संजय राऊत

राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर दोघांमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसत होतं.
Photos of Rahul Gandhi and Sanjay Raut
Photos of Rahul Gandhi and Sanjay RautSakal

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या कारवाईनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सावरकरांचा उल्लेख केला आणि राज्यासह देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाने राहुल गांधी यांना सावरकरांबद्दलच्या विधानावरुन चांगलंच सुनावलं होतं. त्यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र दिसून येत होतं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली.

Photos of Rahul Gandhi and Sanjay Raut
Uddhav Thackeray : 'या' मुद्द्यावरून उद्धव यांचा राहुल गांधींना थेट इशारा; म्हणाले, सहन करणार नाही

या भेटीनंतर संजय राऊत यांनी आपल्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिले आहेत. याविषयी संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये राऊत म्हणाले,"श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com