
Sheetal Mhatre Video : बदनामी पुरुषाची झालीय; ते आमदार कुठे आहेत? संजय राऊतांचा सवाल
शिवसेनेच्या पदाधिकारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल माीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता खासदार संजय राऊत यांनी एक नवा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्हिडीओतले पुरुष आमदार कुठे आहेत, असं त्यांनी विचारलं आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. तसंच पोलीसांची भेटही घेतली होती. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता सरकारने एसआयटी चौकशी नेमण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आमदार प्रकाश सुर्वे यांनी या कोणत्याच प्रकरणात आपली बाजू मांडली नाही. त्यांच्या मुलाने पोलिसांत आरोपींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करत गुन्हा दाखल केला आहे. मात्र या व्यतिरिक्त कोणतीही भूमिका सुर्वे यांनी मांडलेली नाही.
याबद्दल माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "शीतल म्हात्रे प्रकरणात कायद्याचा गैरवापर करताहेत. व्हिडीओ खरा की खोटा याचा शोध घ्या. त्यात मॅार्फिंग झालीय का हे तपासा. या व्हिडीओतले ते पुरूष आमदार कुठे आहेत ? बदनामी पुरूषाची झालीय. त्यांचीही काही बाजू असेल. मिंधे गटाच्या महिलेचं म्हणणं आहे की त्यांची बदनामी सुरू आहे. पण हा व्हिडीओ लाखो कोटी लोकांपर्यंत पोहोचला मग सर्वांना अटक करणार का?"