esakal | उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे दाखवावेत; संजय राऊतांचे थेट आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

शिवाजी महाराज हे एखाद्या कुटुंबाचे दैवत नाही तर, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. ज्या- ज्या ठिकाणी शिव आहे, त्या-त्या ठिकाणी शिवसेना असेलच, अशी ग्वाही देखील राऊत यांनी दिली.

उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे दाखवावेत; संजय राऊतांचे थेट आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजे भोसले यांनी दाखवून द्यावे,'' असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोसले यांना थेट आव्हान बुधवारी दिले. शिवाजी महाराज हे कोणाच्या कुटुंबाचे नाही तर, अवघ्या राज्याचे दैवत आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या वंशजाबाबत राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद जोरदार उमटले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात एका कार्यक्रमात राऊत यांना, "शिवसेनेत शिव हे नाव घेताना वंशजांना विचारले नव्हते, असे उदयनराजे भोसले म्हणतात, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राऊत यांनी, "शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, याचे पुरावे उदयनराजांनी दाखवून द्यावेत. महाराजांची गादी ही वंशज आहे अन्‌ उदयनराजे त्या गादीचे वंशज आहेत. गादीबद्दल आमच्या मनात आदर आहेच,'' असे स्पष्ट केले.

छत्रपतींचा अपमान भाजप सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील

शिवाजी महाराज हे एखाद्या कुटुंबाचे दैवत नाही तर, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. ज्या- ज्या ठिकाणी शिव आहे, त्या-त्या ठिकाणी शिवसेना असेलच, अशी ग्वाही देखील राऊत यांनी दिली.

शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे, त्या बाबत राऊत म्हणाले, "कोणाचा फोटो कोठे लावाचा, याची हे आम्ही ठरवू. त्या बाबत कोणी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही.'' तसेच उदयनराजे हे 15 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. आता ते भाजपचे माजी खासदार आहेत. त्यामुळेच ते आता "असे' बोलत असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.