esakal | जीव गेला तरी चालेल, पण छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही : राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

समन्वय समितीची गरज
सरकारला काही होत नाही पण समन्वय समितीची गरज असते. जेव्हा अश्याप्रकारे सरकार बनत, आघाडी, फ्रंट, युपीए, एनडीए जेव्हा बनत तेव्हा अश्याप्रकारे समन्वय समिती बनते. तेव्हा सरकारला काम करायला सोप होऊन जाते. तीन वेगवेगळ्या विचारांची पार्टी कोणी सेक्युलर, कोणी हिंदुत्ववादी आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम सरकारसाठी बनवलं, ते व्यवस्थित होतात की नाही हे समिती ठरवते, विविदित मुद्दे ही समिती हाताळते.

जीव गेला तरी चालेल, पण छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही : राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विश्वाचे युगपुरुष आहेत, आमचं दैवत आहेत. आमचा जीव जाईल, पण छत्रपतींचा अपमान कधी आम्ही केला नाही. जर कोणी करत आले आणि विनाकारण आम्हाला प्रश्न विचारत असतील तर ते गप्प का? याबाबत प्रमुख लोक आहेत, छत्रपतींबाबत बोलण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे अशा प्रमुख लोकांना हा प्रश्न विचारला पाहिजे. शिवसेनेच्या विरोधात ज्यांनी 4 दिवसांपूर्वी तावातावाने वक्तव्य केली होती, त्यांना याबाबत विचारा, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तानाजी चित्रपटातील पात्रांंशी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, उदयभान राठोड यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांची तुलना करण्यात आली आहे. यावरून वादंग सुरु झाले असून, संजय राऊत यांनीही मत व्यक्त केले आहे.

संजय राऊत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचा राजकीय वापर केला जात आहे. तानाजी चित्रपटात त्यांच्या चेहऱ्यावर राजकीय फोटो लावून प्रचारात आणले जात आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही लोकांनी हंगामा केलेला मी त्यांना तो पाठवला आहे. आता त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहात आहे. काही लोकांनी सातारा बंद केलेला, काही लोकांनी सांगली बंद केली होती, तर काही लोकांनी मोठमोठी वक्तव्ये केली होती.

‘महाविकास’ची समन्वय समिती