esakal | अजित पवारांचे अश्रू महाराष्ट्राला पुन्हा दिसतील : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची बाजू समजून घेतलेली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना कायद्याच्या घटनेचा राजभवनातून जो काळाबाजार झाला तो एक प्रकारे व्यभिचार झाला.  यासंदर्भात तिन्ही पक्षांतर्फे आमचं म्हणणं मांडले असून, भूमिका मांडली आहे. न्यायलयांने काय आदेश द्यावा हे आम्ही नाही सांगू शकत, पण मला खात्री आहे आमची बाजू सत्याची आहे.

अजित पवारांचे अश्रू महाराष्ट्राला पुन्हा दिसतील : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अजित पवार यांच्यावर कोणतातरी दबाव आहे. त्यांची फसवणूक केली असावी. ते किती संवेदनशील आहेत हे मला माहिती आहे. त्यांनी यापूर्वीही अश्रू ढाळले आहेत आणि अश्रू पुन्हा दिसतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (मंगळवार) अंतिम निर्णय येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने सरकार स्थापन केल्याने याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

फडणवीस सरकारविषयी अंतिम निर्णय उद्या; शपथविधीवेळीची पत्रे उघड

संजय राऊत म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची बाजू समजून घेतलेली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना कायद्याच्या घटनेचा राजभवनातून जो काळाबाजार झाला तो एक प्रकारे व्यभिचार झाला.  यासंदर्भात तिन्ही पक्षांतर्फे आमचं म्हणणं मांडले असून, भूमिका मांडली आहे. न्यायलयांने काय आदेश द्यावा हे आम्ही नाही सांगू शकत, पण मला खात्री आहे आमची बाजू सत्याची आहे. सत्यमेव जयते म्हणजे आमची बाजू सत्याचीच आहे, विजय होईल. राजभवन राजकारणाचा अड्डा झाला असून, राज्यपाल एजंट आहेत, हे देशासाठी वाईट आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सचोटीने राजकारण केलं, लोकशाहीचं हत्या कधी त्यांनी केली नाही. सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण आलं असताना सरकार बनू शकत नाही बहुमत नाही हे त्यांनी सांगितलं होते. पण शपथ घेऊन सत्ता स्थापन मी करणार नाही असं ते म्हणाले होते. जेव्हा देसाईंच्या सरकार पडलं होतं, आणि राष्ट्रपती मागे लागले होते आणि त्यांच्या स्मृतिदिनि ज्यांनी पदभार स्वीकारला असं म्हणतंय त्यांनी त्यांचं आधी चरित्र समजून घ्यायला हवे. 163 आमदारांचा पत्र बिनबुडाचं आणि बहुमत नसलेलं स्थापन केलेले सरकार कोणत्या बुडाच? अंधारात शपथ घेता पळून जाता, हे काय चाललंय? पवार कुटुंब आणि नेते जर प्रयत्न करत असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. भाजप जे बोलतोय, सांगतोय हा खोटेपणाचा कळस आहे. त्यावर लक्ष देऊ नका. बहुसंख्य लोक संघ विचाराचे लोक आहेत. संघात सत्य बोलण्याची शिकवण दिली जाते त्यामुळे त्यांनी सत्य बोलावं ही अपेक्षा आहे.