बाळासाहेंबांचे फोटो वापरुन वाढलात, आता काय चर्चा करता : राऊत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

आता दरवाजे उघडे ठेवू नयेत, चर्चेची वेळ निघून गेली. कासवगतीने जाऊ मात्र, टप्पा पार करु. जेव्हा दरवाजे उघडे करायला हवे होते तेव्हा उघडले नाहीत. तेव्हा कडी-कुलूप लावून सगळेजण बसले होते. आता वेळ निघून गेली आहे.

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंचा वापर करून तुम्ही भाजप पक्ष राज्यात वाढविला. आता चर्चेसाठी दरवाजे उघडे ठेवून काही उपयोग नाही. आता काय चर्चा करता, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपची साथ सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकासआघाडी सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असून, भाजपला अद्याप आशा आहे शिवसेना सोबत येईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसाठी दरवाजे खुले असल्याचे  म्हटले आहे.

केंद्र विरुद्ध राज्ये; 'नागरिकत्व' कायद्यास पाच राज्यांचा विरोध 

याविषयी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की आता दरवाजे उघडे ठेवू नयेत, चर्चेची वेळ निघून गेली. कासवगतीने जाऊ मात्र, टप्पा पार करु. जेव्हा दरवाजे उघडे करायला हवे होते तेव्हा उघडले नाहीत. तेव्हा कडी-कुलूप लावून सगळेजण बसले होते. आता वेळ निघून गेली आहे. आम्ही पुढे आलो आहोत. विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करा. विरोधी पक्षाचा इतिहास पाहता चांगले काम करा. बाळासाहेबांचा फोटो लावून भाजप वाढली. आम्ही स्वातंत्र्यपणे लढलो असतो तर 100 हून अधिक जागा जिंकल्या असत्या. आमचे उमेदवार पाडण्याचा भाजपने प्रयत्न केला.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut targets BJP on government formation