आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेली शपथ पूर्ण होणार हे निश्चित आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट आहे. शिवसेनेला कोणी स्वाभिमान व शहाणपणा शिकवू नये.

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये, असा टोला हाणला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) स्मृतिदिन असून, शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात संजय राऊत त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच सरकार स्थापन करणार आहे. अशात आज शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक मोठे नेते हे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस नमन करण्यास येण्याची शक्‍यता आहे. बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळली आहे.

युती केली चूक झाली : रावसाहेब दानवे

संजय राऊत म्हणाले, की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेली शपथ पूर्ण होणार हे निश्चित आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट आहे. शिवसेनेला कोणी स्वाभिमान व शहाणपणा शिकवू नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. स्वाभिमान, हिंदुत्व या सगळ्यांना योग्यवेळी उत्तरे मिळतील.  

बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut taunts Devendra Fadnavis