esakal | संजय राऊत म्हणतात, जेवणाप्रमाणे यादी तयार आहे!
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

गावातील खानावळीत बाहेर बोर्ड लावलेले असतात, की जेवण तयार आहे. त्याप्रमाणे यादी तयार आहे. वाढायला सुरवात केली आहे.

संजय राऊत म्हणतात, जेवणाप्रमाणे यादी तयार आहे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आणण्यात मोठा वाटा उचलणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (रविवार) ट्विट करत उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे, की गावातील खानावळीत बाहेर बोर्ड लावलेले असतात, की जेवण तयार आहे. त्याप्रमाणे यादी तयार आहे. वाढायला सुरवात केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी शायरीबरोबरच ट्विट करणार का याला रिप्लाय करताना राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत हे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रभावीपणे पुढे आले होते. भाजपसोबत युती तोडण्यापासून महाविकासआघाडी सरकार स्थापन होण्यापर्यंत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी सतत शायरी ट्विट करून भाजपला लक्ष्य केले आहे. आता उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतानाही त्यांनी यादी तयार असल्याचे सूचक शब्दांत सांगितले आहे.