
जिकडे शिवसैनिक असतील तिकडेच सत्ता येते - उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबईतील शिवडी येथील अभ्युदयनगर येथील शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी गर्दी केली असून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
(Shivsena New Branch Opening)
"कितीही वादळं आले तरी शिवसेनेची पाळमुळं घट्ट असतील, त्याला कुणीही हलवू शकत नाही. आणि जे गेले आहेत त्यांच्यापैकी एकही शिवसैनिक नाही. आणि त्यांनी लक्षात ठेवावं की सत्तेकडे शिवसैनिक जात नाहीत तर शिवसैनिक जिकडे असतील तिकडे सत्ता येते." असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्व:ता कपाळावर गद्दार असल्याचा शिक्का मारून घेतला आणि ते मागणी करतात की आम्हाला गद्दार म्हणू नका असा टोला त्यांनी यावेळी बंडखोरांना लावला आहे.
हेही वाचा: Viral Video: गाडीत शिवाजी महाराजांची मुर्ती असल्याने तिरूपती बालाजीला प्रवेश नाकारला?
ज्या दगडांना शिवसेनेने शेंदूर फासला, आता तेच शिवसेनेला गिळायला निघाले आहेत. याच कारण स्पष्ट आहे. त्यांची कर्तेकरविती महाशक्ती आणि कळसुत्री बाहुल्यांची संचालक त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करायची, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Web Title: Shivsena New Branch Opening Former Cm Uddhav Thackeray Speech Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..