esakal | शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक; काय होणार निर्णय

बोलून बातमी शोधा

Shivsena}

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेले आहे. त्यांची व्यवस्था वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, रंगशारदातील अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये केली.

शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक; काय होणार निर्णय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर आज (रविवार) शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून, सरकार स्थापनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सत्तास्थापनेसाठी मिळालं भाजपला निमंत्रण; आज बैठक

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेले आहे. त्यांची व्यवस्था वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, रंगशारदातील अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये केली. 'द रिट्रीट'मध्ये शिवसेना आमदारांचा मुक्काम येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री सर्व आमदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज दुपारी या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चर्चा करणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा  होण्याची शक्यता आहे. भाजपला राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.