Shivsena Row : २००० कोटींचा सौदा प्रकरणात राऊतांनी घेतलं फडणवीसांचं नाव; म्हणाले...

यंत्रणा पायाखाली ठेवणाऱ्या भाजपशी आमचा लढा आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut on Devendra Fadnavis over Aurangabad name
Sanjay Raut on Devendra Fadnavis over Aurangabad namegoogle

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यासाठी २००० कोटींचा सौदा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याचा पुनरुच्चार करत आता राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचंही नाव घेतलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"मी काल स्पष्ट सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो की चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाला. निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की निकाल आपल्याच बाजूने लागेल. मिंधे गटाचे लोक, एक केंद्रीय मंत्रीसुद्धा हाच दावा करत होते. तेव्हाही माझ्याकडे माहिती होती की यासाठी २००० कोटींचा सौदा झाला आहे. त्यामुळे न्याय आणि निर्णयात फरक आहे. निर्णय हा प्रचंड पैशाचा वापर करुन विकत घेण्यात आला आहे", तसंच लवकरच आपण या संदर्भातले पुरावे देऊ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut on Devendra Fadnavis over Aurangabad name
Shivsena Row : चिन्ह व नाव तर शिंदेंकडे गेलं; आता शिवसेना भवन कोणाकडे जाणार?

ही लढाई दोन्ही स्तरावर लढली जाईल असंही संजय राऊत म्हणाले आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "ही लढाई दोन स्तरांवर लढली जाईल. कायद्याची आणि जनतेतली. आम्ही लढायला सक्षम आहोत. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून देशात स्वतःला स्वायत्त, स्वतंत्र म्हणवून घेणाऱ्या संस्था, यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या गुलाम झाल्या आहेत. पण आम्ही लोकांना दाखवतोय की सत्य आणि न्यायाची बाजू कशी डावलली जात आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com