Prakash Ambedkar : दोनच दिवसात बेबनाव? शिवसेनेचा प्रकाश आंबेडकरांना मोलाचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prakash ambedkar

Prakash Ambedkar : दोनच दिवसात बेबनाव? शिवसेनेचा प्रकाश आंबेडकरांना मोलाचा सल्ला

मुंबईः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. हे विधान ठाकरे गटाला रुचलं नसल्याचं दिसून येतंय. आज संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना मोलाचा सल्ला दिलाय. तोही जाहीरपणे.

राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधत 'शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल', असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येत 'मविआ'चा भाग व्हायचं असेल तर प्रमुख स्तंभांवर बोलू नये, असं म्हटलं आहे. 'शरद पवार हे देशातल्या भाजपविरोधातल्या आघाडीच्या प्रयत्नातले प्रमुख स्तंभ आहेत.

प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाली आहे. ते महाविकास आघाडीचे घटक होतील. त्यामुळे त्यांनी प्रमुख स्तंभांवर बोलू नये' असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.

शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातून इनकमिंग सुरु होत आहे. शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे नगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून नेते सेनेत येणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.