'उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्यासाठी ममतांची प्रार्थना'

Uddhav Thacekray-Mamata Banerjee
Uddhav Thacekray-Mamata Banerjeegoogle

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Maharashtra Minister Aditya Thackeray) यांची मंगळवारी बैठक झाली. यावेळी संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) देखील उपस्थित होते. ममतांसोबत नेमकी काय चर्चा करण्यात आली? याची माहिती राऊतांनी आज माध्यमांना दिली. यावेळी राजकीय चर्चा झाली असून भाजपकडून तपास यंत्रणांचा होणारा गैरवापर या विषयावर अधिक चर्चा झाल्याचे राऊतांनी सांगितले.

Uddhav Thacekray-Mamata Banerjee
ममता बॅनर्जी-शरद पवार भेट; नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती

ममतांची उद्धव ठाकरेंसाठी सिद्धीविनायकाला प्रार्थना -

ममता बॅनर्जी या शासकीय दौऱ्यावर असल्या तरी मुंबईत आल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा होती. मात्र, आजारपणामुळे त्यांना कोणीही भेटू शकत नाही. त्यामुळे ममता दीदींनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. ममता बॅनर्जींनी मुंबईत आल्याबरोबर सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. तसेच उद्धवजींची प्रकृती लवकर ठीक व्हावी आणि ते लवकर कामाला लागावे आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हावे, यासाठी ममता दीदींनी प्रार्थना केली, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

तपास यंत्रणांच्या कारवाईवर चर्चा -

भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्या. महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते तपास यंत्रणांचा दबाव टाकून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत, असे ममता दीदींनी सांगितले. तसेच महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारी दहशतवाद्यांशी सामना करेल याची खात्री आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

ममता बॅनर्जी-शरद पवार भेट -

ममता बॅनर्जी या खप मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये वाघिणीसारखी झुंज देऊन लांडग्यांना पळवून लावले. त्यांच्याच रांगेत उद्धव ठाकरे, शरद पवार आहेत. शरद पवार यांच्या राजकीय उंचीचा एकही नेता देशात नाही. त्यामुळे ममतांची शरद पवारांसोबतची भेट अतिशय महत्वाची आहे. भाजपमधील हवा ममता दीदीने काढली आहे. समर्थ आघाडी उभी करायची असेल तर सर्वांना सोबत घेऊन जाव लागेल, असं मत पवारांचं आहे. त्यामुळे याबाबत कदाचित आज चर्चा होतील, असंही राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com