शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

उद्या दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वांद्रे पश्चिम पाली हिल येथील नार्वेकर कुटुंबीयांच्या घरी, पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.
Milind Narvekar Mother Vidya Narvekar
Milind Narvekar Mother Vidya NarvekarSakal Digital
Updated on

मुंबई : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांनी मिलिंद नार्वेकरांचे सांत्वन केले. (Shivsena Secretary Milind Narvekar Mother Passes Away)

उद्या दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वांद्रे पश्चिम पाली हिल येथील नार्वेकर कुटुंबीयांच्या घरी, पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सांताक्रुज पश्चिम येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यानंतर सांताक्रुज पश्चिम येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराला उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

Milind Narvekar Mother Vidya Narvekar
शिवसेनेचा भाजपला पाठिंबा अन् काँग्रेस नाराज; महाविकास आघाडी धोक्यात?

दरम्यान, शिंदे गटात गेलेले उदय सामंत यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला. "शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी कळली.. मिलिंदजींचे त्यांच्या आईवर अतोनात प्रेम होते, त्यांच्या जीवनात मातृप्रेमाची पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांना हे दुःख सहन करणयाची ताकद ईश्वराने द्यावी" असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur crime
solapur
IAS तुकाराम मुंढे
raigad fort electric lighting
Marathi News Esakal
www.esakal.com