शिवसेनेचा भाजपला पाठिंबा अन् काँग्रेस नाराज; महाविकास आघाडी धोक्यात?

शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे.
uddhav thackeray balasaheb thorat
uddhav thackeray balasaheb thoratSakal
Updated on

मुंबई : शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर आम्ही कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेत नाही असंही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शिवसेनेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

(Shivsena Vs Congress In Maharashtra)

राष्ट्रपती पदाची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा लढा आहे. स्त्री, पुरूष, आदिवासी, बिगर आदिवासी यामुद्द्यावरील हा लढा नाही. संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे पण तरीही शिवसेनेने भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? असा सवाल काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे.

uddhav thackeray balasaheb thorat
"जलील राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाहीत, त्यांच्या मोर्चाला आम्ही महत्त्व देत नाही"

"शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचं कारण सांगितलं आहे पण त्यामागची शिवसेनेची खरी भूमिका शिवसेनेलाच माहिती आहे. त्याबद्दल आम्ही काय सांगणार?" असं थोरात म्हणाले आहेत. ज्या भाजपने संविधानाचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार पाडलं त्या भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देत असेल तर काय बोलावं? भाजपने शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे आणि त्याच शिवसेनेने भाजपला पाठिंबा देणे हे अनाकलनीय आहे असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

uddhav thackeray balasaheb thorat
MPSC Mobile App: उमेदवारांसाठी आयोगाने सुरू केलं मोबाईल अॅप

दरम्यान, शिवसेनेने आज बैठक घेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आघाडीतील मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com