पहलगामचा बदला घेण्याची भाषा करणारे शांती दूत बनले, ज्या २६ जणींचं कुंकू पुसलं त्याचा...; ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका

Thackeray Group Criticizes PM Modi Over Pahalgam Attack : सायप्रस दौऱ्यावरून शिवसेनेसेच्या ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. पहलगामचा बदला घेण्याची भाषा करणारे पंतप्रधान मोदी आता शांती दूत बनले आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Thackeray Group Criticizes PM Modi Over Pahalgam Attack
Thackeray Group Criticizes PM Modi Over Pahalgam Attack esakal
Updated on

PM Modi honored in Cyprus amid criticism over unfulfilled justice in Pahalgam terror attack : पंतप्रधान मोदी सायप्रसच्या दौऱ्यावर असून त्यांना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ‘‘युद्ध बरे नाही, ही युद्धाची वेळ नाही’’ असं विधान केलं. यावरून आता ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. पहलगामचा बदला घेण्याची भाषा करणारे पंतप्रधान मोदी आता शांती दूत बनले आहेत. या हल्ल्यात ज्या २६ जणींचं कुंकू पुसलं त्याचा बदला पूर्ण झाला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून ही टीका करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com