
Sanjay Raut: "शिवसैनिकांच रक्त सांडणारे राजकारणातूनचं नाही तर जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले"
आज खासदार संजय राऊत यांचा 63 वा वाढदिवस आहे. दरम्यान राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, पारदर्शकपणे काम करायला हवं, राजकीय वातावरण स्वच्छ हवं. बाकीचे नेतेही लवकरच बाहेर येतील. ज्यापद्धतीने लोकांच्या मनात भावनिक उद्रेक आहे. त्यावरून दिसून येते की चुकीच्या कामावर न्यायालयाचे हतोडे पडत आहेत. आम्ही वारवार लढत राहू टक्कर देत राहू लवकरच आकाश निरभ्र होईल. वातावरण मोकळं होईल असंही ते म्हणालेत.
हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
कालच्या शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाच्या झालेल्या राड्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, असे प्रकार नारायण राणे सोडून गेले तेव्हा त्यांच्या तिथेही अशा राड्याच्या घटना घडत होत्या. आज ते कुठे आहेत. आज ते कुठे आहेत. आज तिथे शिवसेना आहे. ठाण्यातसुद्धा आज शिवसेना आहे. आपली सत्ता आहे. पोलिस यंत्रणा आपल्याकडे आहे. पैशांची ताकद आहे. म्हणून आपण शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल शिवसैनिकांच रक्त सांडणार असाल तर हे चालणार नाही. शिवसैनिकांच रक्त इतकं स्वस्त नाही हे लक्षात घ्या. गेल्या 50 वर्षात शिवसैनिकांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब द्यावा लागणार आहे असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ज्यांनी शिवसैनिकांचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते राजकारणातून समाजकरणातून, जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले आहेत. त्यांचं भविष्यात फार काही चांगलं झालं नाही असंही खासदार संजय राऊत म्हणालेत.