"कारकुन, रिक्षावाले मोठे केले, मग ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठं?" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Ekanth Shinde , Thackeray family uddhav thackeray Aditya thackeray mumbai

"कारकुन, रिक्षावाले मोठे केले, मग ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठं?"

मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. शिंदे यांनी ४०हून अधिक आमदारांना आपल्यासोबत घेऊन शिवसेनेत उभी फूट पाडली. आता शिवसेना कोणाची यावरून वाद पेटला असून प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. त्यातच आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. ठाकरे घराण्याने केवळ आमदारकी आणि मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठं असा सवाल त्यांनी केला. (Arvind Swant news in Marathi)

हेही वाचा: Bacchu Kadu : राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो; बच्चू कडूंचा कोणाला इशारा

अरविंद सावंत म्हणाले की, उद्धव साहेब म्हणालेच आहेत की, तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नका. पक्ष काढा आणि कुठ जायचं तिथ जा. पण ती हिंमत नाही. शपथग्रहण करताना हे बाळासाहेबांना विसरले? अशी खंत सावंत यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा: Bacchu Kadu : राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो; बच्चू कडूंचा कोणाला इशारा

ज्या घराण्याने सामान्य माणसाला असामान्य केलं. कोण शिपाई होता, कोण कारकुन होता, कोण रिक्षावाला होता. आमच्यासारखे कारकुन मोठ्या पदावर पोहोचले. सामान्य माणसाला देताना ठाकरे घराण्याने स्वत:साठी कधी काही घेतलं नाही. ज्यांनी तुम्हाला एवढं भरभरून दिलं, त्यांनी एक आमदारकी आणि त्यांच्या मुलाने मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठ? उलट तुम्ही आनंद मानायला हवा होता, अशी टीकाही सावंत यांनी केली.

हेही वाचा: देशात हुकुमशाही पध्दतीनं कारभार सुरू; माजी मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका

दरम्यान अरविंद सावंत यांनी भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. सावंत म्हणाले की, धोका देण्याचा दुर्गुण भाजपमध्ये किती आहेत, हे दिसून येईल. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा विश्वासघात कोणी केला. बिहारमधील सुशील मोदी यांच केवळ नाव मोदी आहे. काश्मीरच्या वेळी कोणाच्या पाठिंत खंजीर खुपसला. हे प्रत्येक राज्यात पाठिंत खंजीर खुपसण्यात माहिर असल्याची टीका अरविंद सावंत म्हणाले. त्यामुळे सुशील मोदींनी स्वत:चा इतिहास वाचावा. तुम्ही जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवता, तेव्हा बाकीचे बोट तुमच्याकडे असतात, अशी टीकाही सावंत यांनी केली.

Web Title: Shivsena Uddhav Thackeray Arvind Sawant Criticize To Eknath Shinde Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..