Uddhav Thackeray on CM : ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही ते आपलं भविष्य ठरवणार?; ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांची चिखली इथं सभा पार पडली यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeraysakal
Updated on

बुलडाणा : ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही, ते आपलं भविष्य ठरवणार अशा शब्दांत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेंबाबत एकामागून एक मुद्द्यांवर त्यांनी सडकून टीका केली. (ShivSena Uddhav Thackeray Buldhana Chikhali Rally)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde : कामाख्या देवीच्या दर्शनानंतर CM शिंदे म्हणाले; आज खऱ्या अर्थाने...

ठाकरे म्हणाले, काहीजण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेलेत. हे मी म्हटलेलं नाही त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यानं हे म्हटलं आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शीवतीर्थावर शपथ घेतली त्यानंतर आमची कुलस्वामिनी एकवीरा देवी त्यानंतर अयोध्येला गेलो होतो. पण हे आज तिकडं गेलेत नवस फेडायला गेल्या आठवड्यात गेले होते स्वतःचा हात दाखवायला.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
WhatsApp च्या इतिहासातील सर्वात मोठी हॅकिंग, भारतासह जगभरातील ५०० कोटी यूजर्सचा डेटा चोरीला

गेल्या स्वतःचं भविष्य माहिती नाही, तो आपलं भविष्य ठरवणार? तुमच्या हातकी सफाई आम्ही पाहिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आहे. तुमचं भविष्य हे कुडमुडे ज्योतिषाला विचारुन उपयोग नाही. तुमचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठं म्हटलं की, उठायचं बस म्हणायचं तर बसायचं. आणि हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघालेत, अशी कठोर शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

बुलडाण्यात मला काही जुने चेहरे दिसत नाहीत. कारण ते जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना वाटलं बुलडाणा म्हणजे माझी मालमत्ता आहे. पण इथं जमलेले मर्द मावळ्यांचा उत्साह बघितल्यांवर असं वाटतंय की अन्याय जाळायला निघालेल्या या पेटत्या मशाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com