शिवसेनेला पटकणारा जन्माला यायचाय : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

निवडणुकीसाठीच राम मंदिराचा मुद्दा
राम मंदिराचा मुद्दा जुमला आहे का? राम मंदिर हा न्यायालयाचा विषय होता, मग मते का मागितली. त्यामुळेच राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच घेतला आहे, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई : शिवसेनेला पटकावणारा अजून जन्माला आलेला नाही. लाटांना आम्ही जुमानत नाही, आम्ही भगव्या लाटेला मानतो. लाटेची आम्ही वाट लावू, असा थेट इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला. 

शिवसेना स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच शिवसेनेला पटक देंगे असे म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे बाईने आपल्याला शहाणपणा शिकविले असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''शिवसेनेमुळे मराठी माणसाला ताकद कळाली. आम्हाला लेचपेच समजण्याची चूक करू नका. घोषणेतला फोलपणा दाखविणे म्हणजे टीका करणे नव्हे. युती झाली तर कुणाच्या जागा वाढतील. निवडणुकीत जय पराजयापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. देश किती पुढे याईल यात रस नाही. कर्जमाफीचा आम्ही पर्दाफाश केल्यामुळे सरकारकडून सरकार मजबूर असले तरी देश मजबूत असले पाहिजे. शिवसेनेला स्वतःची नाही तर देशाची चिंता आहे. निवडणुका देव, देश आणि धर्मासाठीच लढल्या पाहिजेत.''

निवडणुकीसाठीच राम मंदिराचा मुद्दा
राम मंदिराचा मुद्दा जुमला आहे का? राम मंदिर हा न्यायालयाचा विषय होता, मग मते का मागितली. त्यामुळेच राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच घेतला आहे, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Uddhav Thackeray criticize Amit Shah on alliance in Maharashtra