
मुंबई- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या या दिल्ली भेटीवरून विरोधकांनी टीका केली आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल कला. याशिवाय त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत.
नरेश म्हस्के म्हणालेत की, 'उद्धव ठाकरेंचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते, पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कस नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता. निवडणुकीत फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे.'
दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा हा दौरा होता. असा गंभीर आरोप म्हस्के यांनी केला आहे. गुप्ता बंधू काहीच महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले होते. सरकारला मुंबईत समजेल म्हणून त्यांनी हा दिल्लीत दौरा आणला असेल. 7 तारखेला संजय राऊत यांनी दुपारी ही भेट घडवून आणल्याच दिसत आहे, असं ते म्हणाले.
ही भेट कशासाठी झाली याची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे.ज्या माणसाने एका देशाला फसवलं त्याची भेट का घेतली ? त्यांच्या घरातील CCTV Band केले असतील तर रस्त्यावरचे सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा. आदेश गुप्ता, राजेश गुप्ता अशी त्यांची नावं आहेत. अशा व्यक्तीची पहिली चौकशी झाली पाहिजे
.एक राजकीय नेता दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्या नेत्यांच्या घरी बैठक होते त्याचा संजय राऊत यांनी पहिले खुलासा करावा, असंही म्हस्के म्हणाले.
आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जेकब झुमा २०१८ मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. तिथे त्यांना अटकही झाली होती
डेहराडूनचे बिल्डर सतेंद्र सिंग साहनी उर्फ बाबा साहनी यांनी सहस्रधारा रोडवरील पॅसिफिक गोल्फ अपार्टमेंटच्या आठव्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट आणि त्याच्या मुलाच्या जबाबाच्या आधारे सहारनपूर पोलिसांनी अजय कुमार गुप्ता आणि त्याचा मेहुणा अनिल गुप्ता यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनिल गुप्ता आणि अजय गुप्ता यांना अटक झाली होती
अजय, अतुल आणि राजेश गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे. अतुल गुप्ता यांनी पहिल्यांदा चपलांचा व्यवसाय केला आणि नंतर सहारा कॉम्प्युटर सुरू केले. त्यानंतर त्यांनी खाणकाम, हवाई प्रवास, ऊर्जा आणि माध्यम यांसारख्या उद्योगांमध्ये स्वतःचा विस्तार केला
कंपनीच्या एका कामानिमित्त १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. तिथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राजकारणी जेकब झुमा यांची भेट घेतली. झुमा २००९ ते २०१८ पर्यंत देशाचे अध्यक्ष होते. गुप्ता बंधूंवर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी झुमाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे ज्यामुळे या प्रक्रियेत सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले
२०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत अतुल गुप्ता हे १० सर्वात श्रीमंतांच्या यादीत होते आणि त्यांची संपत्ती ७०० दशलक्ष डॉलर इतकी होती.२००९ मध्ये झुमा यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अनेक घोटाळ्यांमध्ये या भावांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. झुमांवरच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी झोंडो कमिशन स्थापन करण्यात आले. कमिशनच्या अहवालातही झुमा यांच्यासह गुप्तांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.