Uddhav Thackeray : "जन्म घ्यावा तर कर्नाटकातच..."; संतप्त ठाकरेंना झाली चंद्रकांत पाटलांची आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Chandrakant Patil
Uddhav Thackeray : "जन्म घ्यावा तर कर्नाटकातच..."; संतप्त ठाकरेंना झाली चंद्रकांत पाटलांची आठवण

Uddhav Thackeray : "जन्म घ्यावा तर कर्नाटकातच..."; संतप्त ठाकरेंना झाली चंद्रकांत पाटलांची आठवण

कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न सध्या चांगलाच तापत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली असून हा भाग केंद्रशासित म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी या सीमाप्रश्नाबद्दलची आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत टीका केली आहे. जोवर कर्नाटकप्रकरणी कोणताही ठराव होत नाही, तोपर्यंत सीमावर्ती भाग केंद्रशासित व्हावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

हेही वाचा: Maharashtra Karnataka border issue: तोपर्यंत 'हा' भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा; उद्धव ठाकरेंची मागणी

चंद्रकांत पाटील म्हणतात, जन्म घ्यावा तर कर्नाटकात, असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, "कर्नाटक या देशातलं राज्य आहे की नाही? जे बंधन आम्हाला आहे, ते कर्नाटकाला आहे की नाही? कर्नाटकचा एकही मंत्री म्हणाला नाही की जन्म घ्यावा तो महाराष्ट्रामध्ये जाऊन. पण चंद्रकांत दादा म्हणतात की जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्ये."

हेही वाचा: चंद्रकांतदादा म्हणतात "जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्येच'

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी समन्वय मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमधल्या एका कार्यक्रमात २०१८ साली एक कन्नड गाणं म्हटलं होतं. या गाण्याचे बोल हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू असे होते. जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्येच असा या गाण्याचा अर्थ आहे. यामुळे त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाची आठवण करून दिली आहे.