"रडण्याचे ढोंग करू नका..."; उद्धव ठाकरेंचा कदमांना टोला | Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

"रडण्याचे ढोंग करू नका..."; उद्धव ठाकरेंचा कदमांना टोला

मुंबई : शिंदे गटात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना इकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम मिटिंग घेऊन संवाद साधला आहे. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास कदम यांची काल शिवसेनेनी हकालपट्टी केल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांना शिवसेनेबद्दल बोलताना अश्रू अनावर झाल्या होत्या. त्यानंतर तुम्ही जे भोगायचं ते भोगलंय, आता उगीच रडण्याचे ढोंग करू नका असा टोला ठाकरेंनी कदमांना लावला आहे.

(Former CM Uddhav Thackeray Meeting)

हेही वाचा: ठाकरेंनी पाठिंबा दिलेल्या मार्गारेट अल्वांनी कधीकाळी शिवसेना फोडली होती

शिंदे यांनी आज १२ सेना खासदारांची दिल्लीत भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही दिलं आहे त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. "तुम्हाला ज्यांना जायचं असेल त्यांनी बिनधास्त जा पण उगाच रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला जे भोगायचं ते तुम्ही भोगलंय पण आता नाटकं करू नका." असा संताप ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: पत्राचाळ प्रकरण : राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना EDचे समन्स

"तुम्ही मागितलं तर मी काहीही देईन पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, मी बाळासाहेबांचा पुत्र आहे तुमच्या हाताला काही लागू देणार नाही." असं म्हणत येत्या आठ दिवसांत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपल्या शिवसेना वाढवण्याचं काम करा शिवसैनिक चवताळून उठले तर काहीही होऊ शकतं म्हणून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा आणि मला मातोश्रीवर भेटायला या अशा सूचना ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: Shivsena Uddhav Thackeray On Ramdas Kadam Cry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top