Uddhav Thackeray: तर आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही... तरुण शेतकऱ्याने ठाकरेंसमोर मांडली कैफियत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray: तर आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही... तरुण शेतकऱ्याने ठाकरेंसमोर मांडली कैफियत

Uddhav Thackeray: तर आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही... तरुण शेतकऱ्याने ठाकरेंसमोर मांडली कैफियत

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत उद्धव ठाकरे यांनी शेतकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत मी तुमच्यासोबत आहे म्हणत शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवं त्याचबरोबर सुडाने पेटून उठा. मी कायम तुमच्या सोबत आहे. तुमचा आवाज बनून सरकारसमोर जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव समोर ठेवेल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. ते सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.

यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. आम्ही कर्ज काढून शेतात घातलं पण तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. वर्षभर केलेलं कष्ट, मेहनत पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली. जे मंत्री संत्री पाहणी करण्यासाठी येतात ते म्हणतात पंचनामे करणार मग तुम्हाला पैसे मिळणार. जमलेल्या शेतकाऱ्यातून एका तरुण शेतकाऱ्याने आपली व्यथा मांडली. मी तरुण शेतकरी आहे. मी बँक आणि सावकरांकडून कर्ज काढलं मी त्या नोटिसला घाबरात नाही पण, जे शेतकरी माझ्यासाठी जमीनदार झालेत ते मला त्रास देत आहेत. बँकवाले त्रास देत आहेत. मग माझ्यासारखा शेतकरी कशाला जगेल तो आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी तरुण शेतकऱ्याने सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तर शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

शिवसेनेत शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे हा दौरा ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केला असल्याने, सत्ताधारी यांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे. उद्धव ठाकरे आजारी असतांना देखील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे.