Prakash Ambedkar : शिवसेना-वंचितचं ठरलं; प्रकाश आंबेडकरांनी दिली महत्त्वाची माहिती

Uddhav Thackeray-Prakash Ambedkar
Uddhav Thackeray-Prakash AmbedkarSakal

मुंबईः ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी झालेली आहे. मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा वंचितला सोबत घेण्यासाठी विरोध असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पुढे आघाडीची चर्चा होत नसल्याची माहिती आहे.

हेही वाचाः ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

परंतु येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेमध्ये महानगर पालिका निवडणुका एकत्र लढवायचं ठरलं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत नेण्याबाबत शिवसेना प्रयत्न करीत आहे. मात्र राष्ट्रवादीला वंचितला सोबत घ्यायला विरोध असून काँग्रेसचाही छुपा विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray-Prakash Ambedkar
Delhi Girl Accident : अपघातानंतर अंजली घरी गेली होती; मैत्रिणीच्या जबाबाने खळबळ

त्यांनी पुढे म्हणाले की, गरीब मराठा सत्तेत यावा असं राष्ट्रवादीला वाटत नसावं म्हणून त्यांचा विरोध दिसतोय.असं असलं तरी आमचा आणि शिवसेनेचा निर्णय झाला, तो फक्त आम्हाला जाहीर करायचा आहे, असं स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com