
फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात राऊतांचा दौरा; म्हणतात, सेनेची ताकद...
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज सायंकाळपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) बालेकिल्ल्यात गेल्या एक महिन्यातील राऊतांचा हा दुसरा दौरा आहे. शिवसेनेला नागपुरात घट्ट पाय रोवायचे आहेत. नागपूर हिंदूत्वाचा गड आहे. त्यामुळे आम्ही नागपुरात शिवसेनेची ताकद वाढवत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा: संजय राऊत यांच्या विधानाबाबत याचिका
नागपुरात आमच्यासारखे लोक गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक जमतात. आता नागपुरात शिवसेनेची ताकद वाढवणार आहोत. आदित्य ठाकरे देखील नागपूरचा दौरा करणार आहेत. आधी देखील नागपुरात शिवसेनेची ताकद होती. शिवसेनेनं विदर्भात प्रामुख्यानं लक्ष घालायला सुरुवात केली आहे. २०२४ साली आम्हाला मजबूतीनं उभं राहायचं असेल तर आम्हाला विदर्भात काम करणं गरजेचं आहे. अनेक जिल्ह्यात नव्याने कार्य सुरू झाले आहे. २०२४ ची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. नागपुरात महापालिकेची निवडणूक आहे. त्यासाठी शिवसेना तयारी करत आहे, असंही राऊतांनी सांगितलं.
मुंबईच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार व्यक्ती आहेत. देशात विमानतळापासून सर्वच विकलंय. आपल्या मर्जीतील दोन उद्योगपतींना देश विकलाय. आता कोणाची मालमत्ता विकताय. शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. गरिबांच्या खात्यावर १५ लाख टाकणार होते. पण, अद्याप घोषणा पूर्ण झाल्या नाहीत. देशाला विकून मिळवलेला पैसा कुठे टाकला? अशी टीका मोदी सरकारला लगावला.
सोमय्यांना इशारा -
आयएनएस विक्रांत हा खूप मोठा घोटाळा आहे. त्याच्या पैशांचा हिशोब घेतला जाईल. कोणी कितीही बडबड केली. तरीही मुंबई पोलिस गुन्ह्याच्या तपासासाठी सक्षम आहेत. आता पोलिस लवकरच तपास करून कारवाई करतील. पोलिस तपासात काय निष्पन्न होतं हे लवकरच पुढे येईल, असा इशारा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिला.
Web Title: Shivsena Will More Powerful In Nagpur Says Sanjay Raut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..