Shivsena : शिवसेना भवनासह पक्षाच्या निधीबाबत कार्यकारणीत मोठा निर्णय; आता...

eknath shinde got election symbol but  will not be able to claim on shiv sena bhawan maharashtra politics
eknath shinde got election symbol but will not be able to claim on shiv sena bhawan maharashtra politics

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर प्रथमच शिंदे गटाने अधिकृत शिवसेना पक्षाची कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे. यावेळी शिवसेना भवन आणि पक्षाच्या अकाउंटवर हक्क सांगण्याबाबतची भूमिक स्पष्ट केली.

eknath shinde got election symbol but  will not be able to claim on shiv sena bhawan maharashtra politics
भूमिपुत्रांसाठी मोठी बातमी; शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे ठराव केले पारित

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच सर्व निर्णय झाले. घटनेला अनुसरूनच एकनाथ शिंदे यांनी कार्यकारणीला संबोधित केलं.

दरम्यान कोणाच्याही संपत्तीवर आणि अकाऊंटवर आम्ही अधिकार सांगणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढं चालल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केल्याची माहिती सामंत यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे शिंदे गट शिवसेना भवन आणि शिवसेना पक्षाच्या अकाउंटवर हक्क सांगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

eknath shinde got election symbol but  will not be able to claim on shiv sena bhawan maharashtra politics
राहुल गांधींना चीनविषयी चांगले ज्ञान असेल तर...; मोदी सरकारमधील मंत्र्यांचं मोठं विधान

शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये आज अनेक महत्त्वाचे ठराव झाले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी कायम आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वाधिकार शिंदे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव झाला. ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच वि.दा. सावरकर यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याचा ठरावही घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com