महामंडळच स्वच्छ करणार ‘शिवशाही’

गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळाच्या ‘शिवशाही’ बस स्वच्छ करण्यावरून निर्माण झालेला प्रश्‍न निकालात निघाला आहे. बसमालक व व्यवस्थापन यांच्यात गाड्या स्वच्छ करण्यावरून वाद निर्माण झाला होता. मळक्‍या गाड्या रस्त्यावर धावत असल्याने राज्य सरकारची नाच्चकी होत आहे. ‘शिवशाही’ महामंडळच स्वच्छ करणार असून त्याचे पैसे गाडीमालकाकडून वसूल करण्याचे परिपत्रक निघाले आहे.

‘शिवशाही गाड्या धुवायच्या कोणी?’ अशा मथळ्याखाली २४ ऑगस्टला ‘मुंबई टुडे’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. राज्यात दोन हजार ‘शिवशाही’ बस एसटीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. आजपर्यंत ८३८ शिवशाही बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत. शिवशाही बस चालवण्यासाठी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. करारावर चालत असलेल्या ‘शिवशाही’ बस साफ करण्यावरून महामंडळ व मालकांच्या वादात राज्याच्या अब्रूची लक्तरे निघत आहेत. त्याकडे सरकारने लक्ष वेधल्यानंतर महामंडळाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार सर्व आगारप्रमुख व नियंत्रकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

Web Title: Shivshahi bus to be cleaned by Mahamandal