'जनाब बाळासाहेब ठाकरे' नामांतर करून दाखवलं; शिवशाही कॅलेंडरवरून भाजपची शिवसेनेवर टीका

shivsena
shivsena

मुंबई - नववर्षानिमित्त शिवशाही कॅलेंडर 2021 छापलं आहे. यावरून आात भाजपने जोरदार टीका केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात, उर्दुमध्येही हे कॅलेंडर छापल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल झाले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी कॅलेंडर हातात धरून व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर ट्विटरवरून टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर म्हटलं की,  शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावरूनही भातखळकर यांनी शिवसेनेला धारेवर धरलं. भातखळकर यांनी म्हटलं की, त्यावेळीच मी सांगितलं होतं शिवसेनेनं भगवा सोडला आता हिरवा घेणं बाकी आहे. वडाळा विधानसभेच्या शिवसेनेनं उर्दूत कॅलेंडर काढलं. त्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा केला असल्याचंही ते म्हणाले.

तसंच उर्दू, मुस्लीम कॅलेंडरप्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदयही देण्याचं काम केलं. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतींच्या दिवशी केवळ शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस यातून करण्यात आलं आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो,असंही भातखळकर या व्हिडिओमध्ये म्हणाले. औरंगाबादचं नाव संभाजीनगर नाही करता आलं पण मतांच्या लालसेपोटी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नामांतरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं करून दाखवलं असल्याचंही अतुल भातखळकर म्हणाले.

दिनदर्शिकेवर शिवशाही कॅलेंडर 2021 असं लिहिण्यात आलं आहे. सोबतच मराठीसह इंग्रजी आणि उर्दू भाषेचा वापरही करण्यात आला आहे. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आलाय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही नावाआधी जनाब असं लावण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com