शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare

बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयाचा खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उभ्या महाराष्ट्राला आपल्या साहित्यानं वेड लावणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुग्णालय प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आले की, बाबासाहेबांना गेल्या आठवडाभरापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना न्युमोनियाची लागण झाली आहे. अजून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

बाबासाहेबांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही वेळातच त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे यासंदर्भात अधिक माहिती देणार आहेत.

बाबासाहेब हे त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती केली होती. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. केवळ महाराष्ट्रातच नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेब यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाबासाहेब आणि त्यांनी लिहिलेले शिवचरित्र यांची नेहमीच चर्चा होत असते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वांनीच त्यांच्या शिवचरित्राचे पारायण केले असल्याचे दिसून आले आहे. बाबासाहेब यांनी सुरुवातीला शिवव्याख्याते म्हणून सुरुवात केली होती. त्यांच्या शिवचरित्राला अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला.

loading image
go to top