परमबीर यांच्या जीवाला धोका असल्याचं ऐकून धक्का बसला - गृहमंत्री दिलिप वळसे-पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil and Param Bir Singh

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंग यांच्या वकिलाने केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

परमबीर यांच्या जीवाला धोका असल्याचं ऐकून धक्का बसला - गृहमंत्री

मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह (param bir singh) हे मुंबईत दाखल झाले आहेत. जे काही सांगायचे ते न्यायालयात सांगू असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walase Patil) यांनी परमबीर सिंह यांच्या वकिलाने केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर यांच्या जीवाला मुंबईत धोका असल्याचा दावा वकिलांनी केला होता. यावर गृहमंत्री म्हणाले की, परमबीर सिंह यांना मुंबईत जीवाला धोका वाटत असल्याचं ऐकून धक्का बसला आहे

गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी म्हटलं की, मुंबई आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांनी काम केलं आहे. इतकी महत्वाची पदे भूषवलेल्या व्यक्तीला जीवाला धोका वाटत असल्याचं जाणून धक्का बसला. एखाद्याकडून त्यांना धोका आहे असं वाटत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही त्यामध्ये लक्ष घालू. आम्हाला माहिती नाही की ते कुठे आहेत असंही गृहमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा: शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली

परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तसंच दोनच दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांच्या वकिलांकडून ते देशाबाहेर गेले नसल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. आपण सीबीआयसमोर हजर राहू असं परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं. परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून ते गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता होते. त्यांना न्यायालयाने फरार घोषित केलं होतं. एनसीबीने सुद्धा त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आज ते युनिट ११ समोर चौकशीसाठी हजर झाले आहेत.

loading image
go to top