सोलापुरातील धक्कादायक घटना! रिमांड होममधून अल्पवयीन मुलगा, तर घरगुती वादातून सखी वन टॉप सेंटरमध्ये आलेली विवाहिता बेपत्ता; पोलिस घेत आहेत दोघांचा शोध

सोलापुरातील रिमांड होममधून अक्कलकोट तालुक्यातील १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. कोणीतरी आमिष दाखवून त्याला पळवून नेल्याची फिर्याद सदर बझार पोलिसांत दाखल झाली आहे. विशेष बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी हाच मुलगा रिमांड होममधून बेपत्ता झाला होता.
Missing girl
Missing girlesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील रिमांड होममधून अक्कलकोट तालुक्यातील १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. कोणीतरी आमिष दाखवून त्याला पळवून नेल्याची फिर्याद सदर बझार पोलिसांत दाखल झाली आहे. विशेषबाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी हाच मुलगा रिमांड होममधून बेपत्ता झाला होता. यावरून रिमांड होममधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रिमांड होममध्ये १८ वर्षांखालील अल्पवयीन मुले ठेवली जातात. त्यामध्ये आई-वडील नसल्याने त्यांचा सांभाळ करायला कोणी नसलेले, गुन्ह्यातील अल्पवयीन बालके देखील त्या ठिकाणी असतात. रिमांड होममधून १० जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास पळून गेलेल्या अल्पवयीन मुलाला आई-वडील नाहीत. त्याला कोणी सांभाळायला नसल्याने तो सध्या रिमांड होममध्ये आहे. ५८ वर्षीय सूर्यकांत माणिकराव देशमुख (रा. भूषणनगर, सोलापूर) रेक्टर त्या बालकांच्या देखभालीसाठी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते बाथरूमला गेल्यावर कोणीतरी त्या अल्पवयीन मुलाला फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. पोलिस म्हणतात, मुलांना बागेत खेळायला सोडले होते. त्यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून तो पळून गेला आहे.

यापूर्वी देखील तो पळून गेला आणि चार-पाच दिवसांनी पुन्हा आला. आता देखील तो परत येईल, असे सांगण्यात आले. मात्र, एकच मुलगा रिमांड होममधून पळून जातो हे विशेषच. रिमांड होममधून पळालेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे फोटो अक्कलकोटसह सर्व पोलिस ठाण्यांना पाठविले आहेत. सोशल मीडियावरही त्याचा फोटो व माहिती प्रसारित करून त्याचा शोध घेतला जात आहे. सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पारडे तपास करीत आहेत.

सखी वन टॉप सेंटरमधून बेपत्ता झाली विवाहिता

आई-वडील ऊसतोड मजूर, त्यांनी मुलीचा विवाह लावून दिला होता. पण, मुलीच्या सासरी सतत भांडणे सुरू होती. पती-पत्नीच्या भांडणात तिच्या आई-वडिलांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी मुलीला समुपदेशनासाठी सखी वन टॉप सेंटरमध्ये आणले. त्या ठिकाणी सोडून ते गावी परतले. पण, ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता ती विवाहिता त्या ठिकाणी नव्हतीच. तेथील कर्मचाऱ्यांनी इतरत्र शोध घेतला, पण ती विवाहिता सापडली नाही. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी सदर बझार पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. समुपदेशनासाठी आलेली विवाहिता त्यांच्यासाठी आधार असलेल्या सखी वन टॉप सेंटरमधून पळून जाते, हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com