सोलापुरातील धक्कादायक प्रकार! एसटी बसचा कंत्राटी चालकच देत होता २५०० रुपयात दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र; न्यायालयाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

एसटी बस प्रवासात सवलत मिळावी म्हणून अडीच हजार रुपयांत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या तरूणास शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
ST Bus
ST Busesakal
Updated on

सोलापूर : एसटी बस प्रवासात सवलत मिळावी म्हणून अडीच हजार रुपयांत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या तरूणास शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. संगमेश्वर मल्लिकार्जुन अळगुडगी (वय ३७, रा. कर्णिक नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

संशयित आरोपी संगमेश्वर अळगुडगी हा एसटी महामंडळात कंत्राटी चालक म्हणून काम करतो. त्याचे वडील लहानपणीच मयत झाले असून आईने त्याचा सांभाळ केला आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी तो कंत्राटी चालक म्हणून एसटी महामंडळात नोकरीला लागला होता. एसटी प्रवासात कोणी जास्त दिव्यांग प्रमाणपत्र पहात नाही, अशा दिव्यांग बनावट प्रमाणपत्रावर बस प्रवासात सवलत मिळते म्हणून त्याने अडीच हजार रुपयांत मोबाईलवरुन बनावट प्रमाणपत्र बनवून द्यायला सुरवात केली, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

तो ४० टक्के, ५० टक्के दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन देत होता. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बनावट प्रमाणपत्र तयार करुन देण्यात आणखी कोणी आहेत का, अशा बाबींचा तपास सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक खेडकर तपास करीत आहेत.

बनावट ग्राहक पाठवून पोलखोल

एका सामान्य नागरिकाने पोलिस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील तक्रार केली होती. त्याअनुषंगाने तपास करताना बनावट प्रमाणपत्रे देणारा मूळ सूत्रधार संगमेश्वर अळगुडगी हाच आहे का, याची पोलखोल करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला होता. त्याच्याकडून अडीच हजार रुपये घेऊन त्या ग्राहकास ४० टक्क्याचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याने त्याला लगेचच पोलिसांनी अटक केली. त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडे दोन बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com