सोलापूर शहरातील धक्कादायक चित्र! 3 दिवसांतून 1 अल्पवयीन मुलगी होतेय आरोपींची शिकार; 19 महिन्यांत अल्पवयीन 79 मुलींवर बलात्कार अन्‌ 110 मुलींचा विनयभंग

अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात कायदा कडक असतानादेखील बालिकांवरील अत्याचार व तिच्या विनयभंगाचे प्रमाण कमी झालेले नाही. सोलापूर शहरात गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील सात महिन्यात प्रत्येक तीन दिवसातून एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार किंवा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
solapur city crime
solapur city crimesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात कायदा कडक असतानादेखील बालिकांवरील अत्याचार व तिच्या विनयभंगाचे प्रमाण कमी झालेले नाही. सोलापूर शहरात गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील सात महिन्यात प्रत्येक तीन दिवसातून एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार किंवा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. मागच्या वर्षीही ‘पॉक्सो’अंतर्गत दाखल गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास असेच होते. पोलिसांनी तातडीने तपास करून प्रत्येक गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई देखील केली आहे.

२०१२ साली केंद्र सरकारने बालकांविरोधात अत्याचारातील आरोपीस कठोर शासन करण्यासाठी कायदा अमलात आणला. १८ पेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलींना कायदा समान आहे. बालक जर १६ वर्षांखालील असेल तर किमान शिक्षा २० वर्षांची आहे, तर सर्वाधिक ही देहदंड आणि फाशीची शिक्षा देखील होऊ शकते. जलदगतीने खटला चालवावा, पुरावे कसे गोळा करावेत, पोलिसांनी तपास कसा करावा यासंदर्भातदेखील नियम सांगितले आहेत.

पालकांचा जबाब, त्वरित न्यायाधीशांसमोर नोंदवून घ्यावा, अशा तरतुदी आहेत. मात्र, काही गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक वाद, पूर्ववैमनस्य, प्रॉपर्टीचा वाद अशा कारणातूनही कायद्याचा आधार ‘पॉक्सो’अंतर्गत फिर्यादी दाखल होत असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. गुन्ह्याच्या मूळाशी गेल्यावर तपास अधिकाऱ्यांना तसे अनुभव आले आहेत. कायद्याचा गैरवापर होत असल्याचे अनेक घटनांमधून निदर्शनास आले आहे, पण हा कायदा खरोखर अल्पवयीन बालकांच्या सुरक्षेचे मोठे अस्त्र आहे.

‘पॉक्सो’अंतर्गत शिक्षेची तरतूद नेमकी काय?

गंभीर स्वरूपात कमीत कमीत शिक्षा २० वर्षांची तर फाशीची शिक्षा होऊ शकते. या कायद्यात प्रिजम्शन्स देखील करण्यात आले आहेत. आरोप खरे आहेत, गुन्हा केला यासंदर्भात प्रिजम्शनचे तत्त्व आहे. असे खटले जलदगती न्यायालयात चालतात. २०१८ साली भारतातील कथुआ आणि उन्नाव येथे बालिकांवरील बलात्कार झाल्याच्या घटनांनंतर गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने ‘पॉक्सो’त बदल करण्यात आले. त्यानुसार आता १२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशीची आणि १६ वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्षे ते २० वर्षे शिक्षेची तरतूद आहे. विनयभंग झाल्याच्या गुन्ह्यात आरोपीला १० ते १४ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

सोलापूर शहरातील गुन्ह्यांची स्थिती

  • (२०२४ मधील ‘पॉक्सो’ची स्थिती)

  • बलात्काराचे एकूण गुन्हे

  • ४३

  • विनयभंगाचे गुन्हे

  • ६६

  • एकूण दाखल गुन्हे

  • १०९

  • -------------------------------------------------------------

  • (२०२५ मधील ‘पॉक्सो’ची स्थिती)

  • बलात्काराचे एकूण गुन्हे

  • ३६

  • विनयभंगाचे गुन्हे

  • ४४

  • एकूण दाखल गुन्हे

  • ८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com