सोलापूर बाजार समितीत धक्कादायक प्रकार! संमतीपत्रावरील उपअडत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक; मागचे कांद्याचे 3 कोटी मिळाले नसल्याच्या तक्रारी, अजूनही 30 लाख मिळालेच नाहीत

गतवर्षी कांद्याच्या हंगामात १२५० कोटींची उलाढाल झाली होती. त्यात तीन कोटी रुपये धनादेशाची तारीख संपूनही न मिळाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केल्या होत्या. सध्या त्यातील ३० लाख रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे.
onion
onionesakal
Updated on: 

सोलापूर : पणन कायद्यानुसार मूळ गाळामालक अडत्याला संमतीपत्रावर दुसऱ्या कोणालाही त्यांचे हक्क व अधिकार देता येत नाहीत, तरीसुद्धा असा धक्कादायक प्रकार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु आहे. गतवर्षी कांद्याच्या हंगामात १२५० कोटींची उलाढाल झाली होती. त्यात तीन कोटी रुपये धनादेशाची तारीख संपूनही न मिळाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केल्या होत्या. सध्या त्यातील ३० लाख रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे.

Loading content, please wait...