व्यावसायिक गॅसचा तुटवडा, कोळसाही महागला! पॅकिंगच्या दरात दुपटीने वाढ; दुग्ध उद्योगाला झळ; कच्चा माल महाग, पुण्यात बुधवारी दूध उद्योजकांची बैठक

पॅकिंगच्या पिशव्या, कप व बाटल्यांच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाल्याने सोलापूरसह राज्यातील दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगाला मोठी झळ बसत आहे. त्यामुळे या उद्योगात अस्थिरता निर्माण झाली असून उद्योजक संभ्रमावस्थेत आहेत.
Milk rate

Milk packing

sakal
Updated on

आप्पासाहेब हत्ताळे

सोलापूर : पॅकिंगच्या पिशव्या, कप व बाटल्यांच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाल्याने सोलापूरसह राज्यातील दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगाला मोठी झळ बसत आहे. त्यामुळे या उद्योगात अस्थिरता निर्माण झाली असून उद्योजक संभ्रमावस्थेत आहेत. युद्धामुळे दर वाढूनही उन्हाळ्यातील वाढत्या मागणीमुळे पॅकिंगची उपलब्धता होत नसल्याने उद्योगासमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

खनिज तेल उद्योगातून मिळणाऱ्या ‘पेट्रोकेमिकल्स’पासून पॅकिंगचे प्लास्टिक तयार केले जाते. परंतु, युद्धामुळे तेल आयातीत मोठी घट झाल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक, बाटल्या, कप, कॅप व लेबल यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने तसेच पुरवठा विस्कळीत झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

रोजचे पॅकिंग ५० टक्क्यांवर

युद्धापूर्वी एक लिटर दुधाच्या पॅकिंगसाठी सुमारे १.२५ रुपये खर्च येत होता, तो आता २.२५ रुपयांवर पोहोचला आहे. बाटल्यांसाठी लागणाऱ्या मालाचे दर १०५ रुपयांवरून १९३ ते १९७ रुपयांपर्यंत वाढले आहेत. कपांचे दरही वाढले आहेत. दरवाढ असूनही पॅकिंग साहित्याची उपलब्धता होत नसल्याने पॅकिंग स्टेशन चालक सध्या केवळ ५० टक्केच पॅकिंग करण्यास तयार आहेत. परिणामी, ज्या ठिकाणी दररोज १ लाखांचे पॅकिंग होत होते, तेथे आता केवळ ५० हजारांचे पॅकिंग केले जात आहे. त्यामुळे दुग्ध उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

गॅस मिळेना; कोळशाचे दरही वाढले

दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रकल्पांतील बॉयलरसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे २२ रुपयांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक वापराच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून तो उपलब्ध होणेही कठीण झाले आहे. अनेक प्रकल्पांत लाकूड, बगॅसऐवजी कोळशाचा वापर केला जातो; मात्र मलेशियातून येणाऱ्या कोळशाचा दर प्रतिटन सात हजारांवरून ११ ते १२ हजार रुपयांपर्यंत वाढला आहे.

पुण्यात बुधवारी दूध उद्योजकांची बैठक

पॅकिंग खर्चात वाढ झाल्याने दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २५) पुण्यातील चेंबर ऑफ कॉमर्स येथे महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या संकटातून मार्ग काढण्याबाबत चर्चा होणार आहे.

व्यावसायिक गॅसचा तुटवडा, बुधवारी बैठक

कच्चा मालाचे दर वाढल्याने दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगाला झळ बसत आहे. डिझेल, कोळशाच्या दरात वाढ आणि व्यावसायिक वापराच्या गॅसचा तुटवडा यामुळे संकट निर्माण झाले आहे. नुकतेच दूधदर वाढीनंतर दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढले आहेत. अशा परिस्‍थितीत अस्थिरता निर्माण झाल्याने उद्योगात एकूणच संभ्रमाचे वातावरण आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली आहे.

- प्रकाश कुतवळ, अध्यक्ष, कुतवळ फुड्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com