मुंबई - राज्यातील २६ हजार ३५४ पैकी पाच हजार १३४ रुग्णालयांनी महाराष्ट्र नर्सिंग कायद्यातील नियमांचे पालन केले नसल्याचे, तपासणीत आढळून आले आहे. या रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक, सर्व हेल्पलाइन क्रमांक आदी माहिती लावणे बंधनकारक होते. मात्र यातील अनेक बाबींची पूर्तता केली नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.