

बीडमध्ये राजकीय कार्यकर्त्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.