Breaking News: 'डीएनए' मॅच झालं, ती हाडं श्रद्धाचीच; आफताबविरुद्ध सर्वात मोठा पुरावा

Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal

नवी दिल्लीः श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये आज सर्वात मोठी अपडेट आली आहे. आफताबने जंगलामध्ये जी हाडं टाकली होती ती हाडं श्रध्दाचीच असल्याचं 'डीएनए' रिपोर्टमधून स्पष्ट झालंय.

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिस कसून तपास करीत आहेत. आज या प्रकरणामध्ये मोठा खुलासा झाला आहे. जंगलामध्ये सापडलेली हाडं आणि श्रद्धाच्या वडिलांच्या रक्ताची डीएनए चाचणी करण्यात आलेली होती. हे दोन्ही डीएनए रिपोर्ट मॅच झालेले आहेत. त्यामुळे आफताबविरुद्ध हा मोठा पुरावा पोलिसांना मिळालाय.

हेही वाचाः मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

विशेष म्हणजे आफताबच्या रुमवर टाईल्समध्ये जे ब्लड सॅम्पल मिळालं होते, त्याचंही डीएनए मॅच झालेलं आहे. या प्रकरणामध्ये आफताबने कबुली दिलेली असली तरी फॉरेन्सिक अहवालावर पोलिसांची मदार होती. शेवटी आफताबविरुद्ध सर्वात मोठा पुरावा आज मिळाला आहे. जंगलामध्ये सापडलेले हाडांचे अवशेष श्रद्धाचेच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

Shraddha Murder Case
Sanjay Raut: ''अमृता वहिनी गप्प कशा बसल्या, तिथेच कानाखाली द्यायला पाहिजे होती''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com