Gautami Patil: "गौतमीचा कार्यक्रम ठेवू अन् अजित पवारांना पण बोलवू"; सत्तारांचा टोमणा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Ajit Pawar, Abdul Sattar, Gautami Patil
Ajit Pawar, Abdul Sattar, Gautami Patil

सिल्लोड : कृषीमंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर चर्चेत असलेली आणि गावाकडच्या जत्रांमध्ये आकर्षण ठरलेली गौतमी पाटील हिच्यावरुन पवारांना टोला लगावला आहे. सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेऊ आणि अजित पवारांनाही बोलावू, असं विधान अब्दुल्ल सत्तार यांनी केलं आहे. (Sillod Gautami Patil dance programme Abdull Sattar Criticises Ajit Pawar)

Ajit Pawar, Abdul Sattar, Gautami Patil
JEE Main Final Score: जेईई मुख्य परीक्षा पेपर 1 चा अंतिम स्कोअर जाहीर; कसा चेक कराल? जाणून घ्या

अजित पवार यांना टोला लगावताना सत्तार म्हणाले, "ज्यांचं वय डोळे मारायचं ते मारतात. त्यांनी लहाणपणी डोळे मारले नसतील म्हणून आता मारत असतील. अजित पवार जे जे बोलतात त्यांला महत्व आहेच"

Ajit Pawar, Abdul Sattar, Gautami Patil
Karnataka : ..तर काँग्रेस घालणार महिला आमदाराच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

ते पुढे म्हणाले, "सिल्लोडला मी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता अजून एकदा ठेवू आणि अजित पवारांना निमंत्रण देऊ. गलतिया सबसे होती है, अजित पवार की छुप जाती है सत्तार की छप जाती है, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com