Loksabha Election : भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडतं कुठं? शिवसेनेच्या दीपक केसरकरांचा थेट सवाल

आमदार नितेश राणे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी येथील उमेदवार भाजपचाच असेल, असे वक्तव्य केले आहे.
Sindhudurg Ratnagiri LokSabha Election 2024 Deepak Kesarkar
Sindhudurg Ratnagiri LokSabha Election 2024 Deepak Kesarkaresakal
Summary

'पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभा राहिला होता.'

सावंतवाडी : पालघर पॅटर्नचा विचार करता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात (Sindhudurg-Ratnagiri Loksabha Election) आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडते कुठे, असा सवाल शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

भाजप व शिंदे शिवसेना यांच्या युतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा कोणाच्या वाट्याला यावी, यावरून स्थानिक पातळीवर राजकारण तापले आहे. येथून शिवसेनेतर्फे (Shiv Sena) किरण सामंत आणि दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आहे. ही जागा शिवसेनेकडे असावी, अशी मागणी त्यांच्या गटाकडून होत आहे.

Sindhudurg Ratnagiri LokSabha Election 2024 Deepak Kesarkar
Shambhuraj Desai : आरेरावीची भाषा मंत्र्याला भोवली! शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवर सातारा पत्रकार संघाचा बहिष्कार

दुसरीकडे आमदार नितेश राणे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी येथील उमेदवार भाजपचाच असेल, असे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे? पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभा राहिला होता.

किरण सामंत हे नाराज नाहीत. मोबाईल स्टेटस म्हणजे कुणाला तरी इशारा असेल किंवा राजकीय गंमत असेल. मात्र, ते लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा रात्रंदिवस प्रचार करून निवडून आणू.’ ते पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यातील शिरोडा येथील ताज पंचतारांकित (फाइव्ह स्टार) हॉटेलचा मोठा प्रश्न मी २५ वर्षांनंतर सोडवून दाखवला. मात्र, काही लोक त्यात राजकारण करत होते. राजन तेली यांच्याबरोबर माझे चांगले संबंध असल्याने मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनीदेखील सहकार्य करण्याचे ग्वाही मला दिली.

Sindhudurg Ratnagiri LokSabha Election 2024 Deepak Kesarkar
Big News : 'वंचित'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर 'इंडिया आघाडी'सोबत जाण्‍यास तयार; साताऱ्यात केली मोठी घोषणा

त्यामुळे लवकरच तो प्रश्नही मार्गी लागेल. फाइव्ह स्टार प्रकल्प झाल्यास तेथील पाचशे जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शिरोडा-वेळागर येथील ताज प्रकल्पामध्येही स्थानिक तरुणांना रोजगार दिला जाणार आहे. यामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या कुटुंबातील एका व्यक्तीला प्राधान्याने नोकरी दिली जाणार आहे. त्याआधी त्यांना प्रकल्प संबंधित ट्रेनिंग दिले जाणार आहे.’

Sindhudurg Ratnagiri LokSabha Election 2024 Deepak Kesarkar
Karnataka Government : कर्नाटकात 237 पैकी 216 तालुके दुष्काळग्रस्त; बेळगाव, खानापूरसह 21 तालुक्यांचा यादीत समावेश

ते पुढे म्हणाले, ‘पालकमंत्री म्हणून मला कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले. आज जरी मी कोल्हापूरचा पालकमंत्री नसलो तरी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावर येण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. जे प्रकल्प आणि प्लॅन मी केले होते, तेच प्लॅन कायम ठेवले जाणार असल्याची ग्वाही नव्या पालकमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर माझे नेहमीच लक्ष राहणार आहे.

Sindhudurg Ratnagiri LokSabha Election 2024 Deepak Kesarkar
Hasan Mushrif : कोल्हापुरातून कोण लढणार माहिती नाही, पण पीएन-सतेज पाटील एकमेकांची नावं घेताहेत; काय म्हणाले मुश्रीफ?

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, ताराबाई अशा प्रत्येक महापुरुषांच्या इतिहासातील पाऊलखुणा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मी तेथे निधी मंजूर केला आहे. त्याचे मला समाधान वाटते. याही पुढे कोल्हापूर जिल्ह्याचा विकासासाठी शिवसेना प्रयत्न करेल.’

ते पुढे म्हणाले, ‘मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्यातून तीन दिवस देण्याचा प्रयत्न करेन. दोन दिवसांपूर्वी मी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी या नात्याने दिल्ली येथे गेलो होतो. यावेळी मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक प्रश्न मांडले. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला. महाराष्ट्राचे अर्थ सचिव यांनी विशेष कौतुक केले.’

Sindhudurg Ratnagiri LokSabha Election 2024 Deepak Kesarkar
मोठी बातमी! नितीन गडकरींचं प्रकरण ताजं असतानाच हिंडलगा कारागृहात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, बेळगावात खळबळ

सिंधुदुर्गास १६४ कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांदा ते बांदा योजनेची अखर्चित ६४ कोटी रुपयांची रक्कम पुन्हा दिली असून, रत्नसिंधू योजनेची २५ कोटींवरून १०० कोटींवर तरतूद केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट पाहायला मिळणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com