सिंधुताई सपकाळ : मुलगी नको असल्याने आई-वडिलांनी ठेवले होते चिंदी नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai Sapkal

सिंधुताई सपकाळ : मुलगी नको असल्याने आई-वडिलांनी ठेवले होते चिंदी नाव

सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात झाला. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. आई-वडिलांना मुलगी नको असल्याने त्यांनी तिचे नाव चिंदी ठेवले होते. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचे काम करीत होते. गाव लहान असल्यामुळे तेथे सुविधा उपलब्ध नव्हत्या. घरची गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिकता आले. (SINDHUTAI SAPKAL passes away)

सिंधुताई सपकाळ नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह २६ वर्षांने मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांना प्रचंड सासूरवास सोसावा लागला. जंगलातील लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळात लपवून ठेवायच्या. क्वचितच घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत होत्या. वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्यांदा गर्भवती असताना आयुष्यातला पहिला संघर्ष केला. (Sindhutai Sapkal Journey)

एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. परंतु, लहान मुलीचा जीव घेतला, तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री रेल्वे स्टेशनवरच झोपायच्या. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे.

हेही वाचा: आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

ममता बाल सदन (Sindhutai Sapkal Ashram)

सिंधुताई यांनी अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा मिळण्यासाठी ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. ही स्थापना १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात सुरू केली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. त्यांनी बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्था

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे, या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाऊंडेशनची स्थापना केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vidarbhaSindhutai Sapkal
loading image
go to top