
राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली.
मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली.
संपूर्ण देशभरातच यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार आहे. मात्र तोपर्यंत राज्यातील परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. राज्यभरात अनेक धरणे कोरडी पडल्याने गावे आणि वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
राज्यात सर्वाधिक टॅंकर औरंगाबाद, बीड आणि नगर जिल्ह्यात सुरू आहेत. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत टॅंकर सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. जनावरांच्या सर्वाधिक चारा छावण्याही बीड, औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यात सुरू असून जनावरांची तेथील संख्या लक्षणीय आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ९५ हजार ५२१ जनावरे चारा छावण्यात आश्रयाला आहेत.
राज्यातील स्थिती (ठळक जिल्हे)
जिल्हा टॅंकर एकूण जनावरे
नाशिक ३६२ ४५८६
नगर ८२७ ३,३६,२०३
पुणे २६९ ११,८१९,
सातारा २७१ ५५,०३२,
सांगली १९९ १८,१९३,
सोलापूर ३३५ १,५४,६७८,
औरंगाबाद ११४६ ३०,३९३,
जालना ६८२ २३,०६९,
बीड ९४० ३,९५,५२१,
उस्मानाबाद २०६ ७२,०२१